भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीन अक्षरी जप पंढरी म्हणे वाचा । कोआटी या जन्मांचा शीण जाय

tin akshari jap pandhari mhane vacha | koati ya janmancha shin jay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तीन अक्षरी जप पंढरी म्हणे वाचा । कोआटी या जन्मांचा शीण जाय ॥१॥ युगायुगीं महात्म्य व्यासें कथियेलें । कलियुगें केलें सोपें पुंडलिकें ॥२॥ महा पापराशी त्यांची होय होळी । विठ्ठलनामें टाळी वाजवितां ॥३॥ एका जनार्दनीं घेतां पैं दर्शन । जद जीवा उद्धरण कलियुगीं ॥४॥