भजनी मालिका
← भजनांकडे परत

थोडें आहे थोडें आहे । चित्त साह्य जालिया

thoden ahe thoden ahe | chitta sahya jaliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
थोडें आहे थोडें आहे । चित्त साह्य जालिया ॥१॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥ अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥२॥ तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥३॥