भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेवूनियां हात गेला नारदमुनी । मंत्र ह्रदयभुवनीं प्रकाशला

thevuniyan hat gela naradamuni | mantra hradayabhuvanin prakashala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ठेवूनियां हात गेला नारदमुनी । मंत्र ह्रदयभुवनीं प्रकाशला ॥१॥ उच्चार करितां त्रिभुवन ठेंगणें । विसरला मनें सापत्न दु:ख ॥२॥ आठवे गोविंद माधव अच्युत । वाचेसी जपत रामनाम ॥३॥ एका जनार्दमीं दासाची कळकळ । धांवला तात्काळ देवराव ॥४॥