भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेवणें अनंत जन्मांचे । सांपडलें आजी सांचें

thevanen anant janmanche | sampadalen aji sanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ठेवणें अनंत जन्मांचे । सांपडलें आजी सांचें ॥१॥ पुंडलिके तें पोखलें । जगा उपकार केलें ॥२॥ महा पातकी चांडाळ । मुक्त होय दरुशनें खळ ॥३॥ एका जनार्दनीं निश्चय । वेदादिका हा आश्रय ॥४॥