भजनी मालिका
← भजनांकडे परत

ते चि करीं मात । जेणें होईल तुझें हित

te chi karin mat | jenen hoil tujhen hit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ते चि करीं मात । जेणें होईल तुझें हित ॥१॥ काय बडबड निमित्य । सुख जिव्हारीं सिणविसी ॥ध्रु.॥ जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हांसे खरजुला ॥२॥ आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी ॥३॥ क्षयरोगी म्हणे परता । सर रोगिया कुष्ठतां ॥४॥ वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोंचें बोले ॥५॥ तुका म्हणे लागों पायां । शुद्ध करा आपणियां ॥६॥