भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव

tayasi nenatin bahu avadati | hoy jayan chittin ek bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥ उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥ कोळी भिल्ल पशु श्वापदें अपार । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥२॥ काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥३॥ तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आम्ही त्याचे पाव धरूनी ठेलों ॥४॥