भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयां ठायीं जातां शुध्द होय अमृत । नारदें ही मात सांगितली

tayan thayin jatan shudhda hoy amrut | naraden hi mat sangitali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तयां ठायीं जातां शुध्द होय अमृत । नारदें ही मात सांगितली ॥१॥ तेव्हां एकादशी आली सोमवारीं । विमान पंढरीं उतरलें ॥२॥ अमृताचें ताट घेउनी आला इंद्र । गर्जती सुरवर जयजयकारें ॥३॥ देव सुरवर आले पंढरीसी । नामा कीर्तनासी उभा असे ॥४॥ सुरवर देव बैसले समस्त । कीर्तनीं नाचत नामदेव ॥५॥ एका जनार्दनीं देव कीर्तनासी । सांडोनी स्वर्गासी इंद्रराव ॥६॥