भजनी मालिका
← भजनांकडे परत

तया साठी वेचूं वाणी । अइकों कानीं वारता

taya sathi vechun vani | aikon kanin varata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तया साठी वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥१॥ क्षेम माझे हरीजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥ परत्रींचे जे सांगाती । त्यांची याती न विचारीं ॥२॥ तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सखी तीं ॥३॥