भजनी मालिका
← भजनांकडे परत

तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम

taya ghadale sakal nem | mukhin vithobachen nam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम॥१॥ कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें। रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥ फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥ तुका म्हणे त्याच्या नांवें । तोचि होइजे स्वभावें॥३॥