भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरि च शोभे वेडी । नग्न होय धड फाडी

tari cha shobhe vedi | nagna hoy dhad phadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरि च शोभे वेडी । नग्न होय धड फाडी ॥१॥ काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥ मृगजळा न्याहाळितां । तान न वजाये सेवितां ॥२॥ न पाहे आणिकांचीवास । शूर बोलिजे तयास ॥३॥ तुका म्हणे या लक्षणे । संत अळंकार लेणें ॥४॥