भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें

tari cha janma yaven | das viththalachen vhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥ नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥ जन्मल्याचे तें फळ। अंगीं लागों नेदी मळ ॥२॥ तुका म्हणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥३॥