भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई

tari cha ha jiv sansarin udas | dharila vishvas tumhan soi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई ॥१॥ एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥ फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखें चि ॥२॥ तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारिला ॥३॥