भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा

taralon mhanauni dharila tatha | tyasi chal jhala phanta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥१॥ वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥ ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥ तुका म्हणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥३॥