भजनी मालिका
← भजनांकडे परत

तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें

tapalyavanchun navhe alankar | pituniyan sar uralen ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥ मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥ कलेवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥२॥ तुका म्हणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरी ॥३॥