भजनी मालिका
← भजनांकडे परत

तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले से

tamasachin tapen papachi sidori | tamogunen bhari ghatale se

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले से ॥१॥ राज्यपदा आड सुखाची संपित्त । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ध्रु.॥ इंद्रियें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥२॥ तुका म्हणे हरीभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥३॥