भजनी मालिका
← भजनांकडे परत

तक्र शिष्या मान । दुधा म्हणे नारायण

takra shishya man | dudha mhane narayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तक्र शिष्या मान । दुधा म्हणे नारायण ॥१॥ ऐशीं ज्ञानाचे डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥ उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥२॥ रसनाशिश्नाचे अंकित । तुका म्हणे वरदळ स्पित ॥३॥