भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया शेवटीं । जागे लटिकें सकळ

svapnichiya goshti | maj dharilen hoten vethi | jaliya shevatin | jage latiken sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया शेवटीं । जागे लटिकें सकळ ॥१॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया शीणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरी आहे ॥ध्रु.॥ सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥२॥ तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥३॥