भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नामाजीं नेणें देवा । करी सेवा भूतांची

svapnamajin nenen deva | kari seva bhutanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वप्नामाजीं नेणें देवा । करी सेवा भूतांची ॥१॥ नाना साधन ते चेष्टा । तेणें कष्टा भरीं भरला ॥२॥ जे जे करी ते उपाधी । मंत्र जपे तो अविधी ॥३॥ सकळ मंत्रा मंत्रराज । एका जनार्दनीं नेणें निज ॥४॥