भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति

svamikaj gurubhakti | pitruvachan seva pati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥ सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥ निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ ॥३॥