भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें

svamichen hen denen | yethen pavalon darshanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥१॥ करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥ कळावया वर्म । हा तों पायांचा चि धर्म ॥२॥ तुका म्हणे सिद्धी । हे चि पाववावी बुद्धी ॥३॥