भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल

svalpa vat chala jaun | vache gaun viththal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥ तुह्मी आह्मी खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥ ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥२॥ तुका म्हणे हें चि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥३॥