भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वहिताकारणें संगती साधुची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें

svahitakaranen sangati sadhuchi | bhaven bhakti harichi bheti tenen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वहिताकारणें संगती साधुची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथें हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥२॥ ब्रह्मा डोळसां तें वेदार्थ नाकळे । तेथें हे आंधळें व्यर्थ होती ॥३॥ वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥ वेदांची हीं बीजाक्षरें हरि दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥