भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या

svahit hit vicharin manasin | kan re nagavisi dehasi ya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या ॥१॥ साव्धान हो पाहे बा पंढरी । धरीं तु अंतईं संतसंग ॥२॥ नको पंडुं फेरी चौर्‍यायंशीं आवृत्ती । गाय तुं किर्ती वैष्णवांची ॥३॥ तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरी ऐसा ॥४॥ सुगम सोपा चुकती जेणें खेपा । एका जनार्दनीं जपा विठ्ठल नाम ॥५॥