भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुटला म्हणतां बांधला होता । मुक्त म्हणे त्याचें अंगीं ये बद्धता

sutala mhanatan bandhala hota | mukta mhane tyachen angin ye baddhata

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुटला म्हणतां बांधला होता । मुक्त म्हणे त्याचें अंगीं ये बद्धता ॥१॥ बद्धता येथें नाहीं मुक्त ते काई । भ्रांती दो ठाई झोंबतसे ॥२॥ स्वप्नीचेनि सुखे सुखासनीं बैसे । जागा जालिया कांहींच नसे ॥३॥ एका जनार्दनीं एकापणा तुटी । बद्ध मोक्षाची तेथें वार्ताहि नुठी ॥४॥