भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्यवंशामाजीं उत्तानपाद राय । सत्यधर्मी होय पराक्रमी

suryavanshamajin uttanapad ray | satyadharmi hoy parakrami

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सूर्यवंशामाजीं उत्तानपाद राय । सत्यधर्मी होय पराक्रमी ॥१॥ भूतांचा मत्सर नाहीं तेथें द्वेष । चारी धर्म निर्दोष चालताती ॥२॥ प्रजेचें समाधान अपत्याचें परी । ऐसा राज्य करी न्याय नीती ॥३॥ एका जनार्दनीं होउनी सावधान । ऐका वर्तमान काय पुढें ॥४॥