भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी

surya andharanten nasi | pari to sanmukh naye tyasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥ माझें जिणें देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥ देहीं देहअभिमान । जीवीं मायेचें तें ध्यान ॥३॥ एका जनार्दनीं माया । देहाधीन देवाराया ॥४॥