भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथें कुंठित गे माय

sundaru balapanachi bunthi gheuni shripati | sanakadikan gati tethen kunthit ge may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथें कुंठित गे माय ॥१॥ ब्रह्मा वेडावलें ते वेंडावलें । पुंडलिकाधीन झालें गे माय ॥२॥ इंद्र चंद्र गुरु उपरमोनी जया सुखा । तो वाळूवंटीं देखा संतासवें गे माय ॥३॥ ऐसा नटधारी मनु सर्वांचे हरी । एका जनार्दनाचे करीं उच्छिष्ट खाय ॥४॥