भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं

sundar mukh sajiren kasturi malavatin | murali vajavit ubha yamuneche tatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं । गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥ मजुंळ मंजुळ वाजवी मुरली । ऐकता माझी चित्तवृत्ति हरली ॥धृ ॥ चारी वेद जया गाताती आनंदें । तो गोकुळीं गाई चारी परमानंदें । श्रुतिशास्त्रें वेधला जयाचिया छंदें । तया गोवळा म्हणती कान्हा आनंदें ॥२॥ ऐशी आवडी भक्तिंची देखा । उच्छिष्ट खातां कांहीं न धरी शंका । एका जनार्दनीं भुलला तयाचिया । सुखा वैकुंठ नावडेचि देखा ॥३॥