भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन

sukhen khaven anna | tyachen karaven chintan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥ त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥ आहे हा आधार। नाम त्याचें विश्वंभर ॥२॥ नाही रिता ठाव । तुका म्हणे पसरीं भाव ॥३॥