भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी

sukhe sansara ha kari | vache uchcharava hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी ॥१॥ दुःखरूप हा संसार । रामनामें सुख साचार ॥२॥ रामनामाचें स्मरण । नाश पावे जन्ममरण ॥३॥ जयापाशीं नाम असे । नारायण तेथें वसे ॥४॥ एका जनार्दनीं नाम । संसार हा परब्रह्मा ॥५॥