भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं

sukh du:kha donhin amuche padarin

सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं । पूर्वीच निर्धारी बांधियेली ॥१॥ आतां का वाईट म्हणो कशासाठीं । आपुली ती राहाटी भोगूं आम्ही ॥२॥ तुम्ही तो व्यापक सर्वांसी निराळें । आमुची कर्मफळें भोगूं आम्ही ॥३॥ कर्ममेळा म्हणे वचन प्रमाण । आमुची निजखूण कळली आम्हां ॥४॥