भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुदिन सुवेळ तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिलाल वो

sudin suvel tujha gondhal vo | panch pran divate doni netranche hilal vo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुदिन सुवेळ तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥ पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥ मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥२॥ बैसली देवता पुढें वैष्णवाचें गाणें वो । उद्गारे गर्जती कंठीं तुळसीचीं दर्शनें वो ॥३॥ स्वानंदाचे ताटीं धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता विठाबाई पंचभूतीं वो ॥४॥ तुझें तुज पावलें माझा नवस पुरवीं आतां वो । तुका म्हणे राखें आपुलिया शरणागता वो ॥५॥