भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुदर्शन घेऊनि हातीं । पावला तो लक्ष्मीपती ।देखतांची श्रीपती । तन्मय बाळ जाला

sudarshan gheuni hatin | pavala to lakshmipati |dekhatanchi shripati | tanmay bal jala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुदर्शन घेऊनि हातीं । पावला तो लक्ष्मीपती ।देखतांची श्रीपती । तन्मय बाळ जाला ॥१॥ बाळकें धरिले चरण । देवें दिधलें आलिंगन । करें कुर्वाळुनी वदन । चुंबनाते दिधले ॥२॥ देव म्हणे बाळकातें । काय अपेक्षा माग मातें । बाळ बोले दूधभातें । मातें देईं सत्वर ॥३॥ हासे वैकुंठीचा राणा । बाळक हें अज्ञाना । एका जनार्दनीं शरण । काय मागणें मागत ॥४॥