भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार । तेथें देहें अहंकार । विरोनि जाये

sthul dehacha vichar | hatan aliya sachar | tethen dehen ahankar | vironi jaye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार । तेथें देहें अहंकार । विरोनि जाये ॥१॥ स्थूल ब्रह्माज्ञान नेत्रीं । स्थूलभोग जागृति वैखरी । हें नव्हे मी ऐसा अंतरी । बोध झाला ॥२॥ मग देहें मारितां तोडितां । पूजितां कां गाजितां । नसे हर्षे खेदवार्ता । तया पुरुषा ॥३॥ एका जनार्दनीं । लीन झाला संतचरणीं । दर्पणामाजीं बिंबोनि । दर्पणातीत ॥४॥