भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोयराईनें मनी करोनी विचार

soyarainen mani karoni vichar

रचनाकार: संत बंका · अभंग
सोयराईनें मनी करोनी विचार । म्हणे हा अविचार करूं कैसा ॥१॥ हा तंव आहे वृध्द ब्राह्मण । दंत कानहीन दुर्बळ तो ॥२॥ यासी अन्न देतां आपुला विचार । मज मारामार करिती लोक ॥३॥ विन्मुख हा जातां पति रागवेल । बोल हा लागेल कपाळासी ॥४॥ वंका म्हणे ऐसा करोनी निर्धार । ठेवी पायावर डोई तेव्हा ॥५॥