भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाहीं

sopanadev nam pavan param | anik uttam jap nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाहीं ॥१॥ माझ्या मना तूं करी कां रे लाहो । सोपानदेव ध्यावो ह्रदयामाजीं ॥२॥ ब्रह्मा अवतार नाम हें सोपान । केलेंसे पावन चराचर ॥३॥ एका जनार्दनीं सोपानाच्या पायीं । ठेवितसे डोई काया वाचा ॥४॥