भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपा मंत्र वाचे हरीहरी म्हणा । तुटेल बंधना यमाचिया

sopa mantra vache harihari mhana | tutel bandhana yamachiya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोपा मंत्र वाचे हरीहरी म्हणा । तुटेल बंधना यमाचिया ॥१॥ न करी आळस हाचि उपदेश । येणें सावकाश तरती जगीं ॥२॥ कलीमाजीं सोपें रामनाम ध्यान । यापरतें साधना आन नाही ॥३॥ एका जनार्दनीं न करीं आळस । रामनाम घोष मुखें करीं ॥४॥