भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे

smaranache vele | vhaven savadh na kale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥ पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥ भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥२॥ तुका म्हणे कळे । तूं चि धावें ऐसें वेळे ॥३॥