भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिंदळीचे सोयरे चोराचीया दया । ते ही जाणा तया संवसर्गी

sindaliche soyare chorachiya daya | te hi jana taya sanvasargi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सिंदळीचे सोयरे चोराचीया दया । ते ही जाणा तया संवसर्गी ॥१॥ फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥ सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष अमृताचें ॥२॥ तुका म्हणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥