भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ

sinchan karitan mul | vruksha volhave sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥ नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥ पाणचोऱ्याचें दार । वरील दाटावें तें थोर ॥२॥ वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥ एक आतुडे चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥ तुका म्हणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥५॥