भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्वानाचिये परी धांवे । विषयासक्त जीवें भावें

shvanachiye pari dhanve | vishayasakta jiven bhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्वानाचिये परी धांवे । विषयासक्त जीवें भावें ॥१॥ नेणे मान अपमान । सदा विषयावरी ध्यान ॥२॥ नाहीं देवाची स्मृती । सदा लोळे विषयावर्ती ॥३॥ नाठवेचि कांहीं धंदा । भुलला तो विषयमदा ॥४॥ एका जनार्दनीं देवा । नाठवी अभागी न करी सेवा ॥५॥