भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भले बुरे त्यास कळे कांहीं

shvanacha to dharma karavi vasavas | bhale bure tyas kale kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भले बुरे त्यास कळे कांहीं ॥१॥ वेश्यांचा धर्म द्रव्य ते हरावें । भलें बुरे भोगावें न कळें कांहीं ॥२॥ निंदकाचा धर्म निंदा ती करावी । भलें बुरें त्यागावी न कळे कांहीं ॥३॥ सज्जानांचा धर्म सर्वाभुतीं दया । भेदाभेद तया न कळे कांहीं ॥४॥ संतांचा तो धर्म अंतरी ती शांती । एका जनार्दनीं वस्ती सर्वांठायीं ॥५॥