भजनी मालिका
← भजनांकडे परत

शूरां साजती हतियारें । गांढया हांसतील पोरें

shuran sajati hatiyaren | gandhaya hansatil poren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शूरां साजती हतियारें । गांढया हांसतील पोरें ॥१॥ काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥ पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥२॥ दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥३॥ मान बुद्धिवंतां । थोर न मनिती पिता ॥४॥ तुका म्हणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥५॥