भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये

shudhdarasen olavali | rasana dhali na dhaye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये ॥१॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्तता ॥ध्रु.॥ आवडे तें तें चि यासी । ब्रम्हरसीं निरसें ॥२॥ तुका म्हणे बहुतां परी । करूना करीं सेवन ॥३॥