भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं

shuddhabija potin | phalen rasal gomatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥ मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥ सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥ तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥