भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्धभाव चित्तीं । तरी कांहीं न लगे युक्ति

shuddhabhav chittin | tari kanhin na lage yukti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शुद्धभाव चित्तीं । तरी कांहीं न लगे युक्ति ॥१॥ नलगे आणिक विचार । शुद्ध भाव हाचि सार ॥२॥ भावाविण वांझे । साधनें तीं अवघीं ओझें ॥३॥ एका जनार्दनीं भाव । पाववी अक्षय तो ठाव ॥४॥