भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध दळणाचें सुख सांगों । मानवत असे सईबाई

shuddha dalanachen sukh sangon | manavat ase saibai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुद्ध दळणाचें सुख सांगों । मानवत असे सईबाई ॥१॥ शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥ शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥ शुद्ध त्याचा पाक शुद्धचीत्त चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥ तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥