भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें

shubh jalya disha avagha chi kal | ashubh mangal mangalachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥१॥ हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥ सुख दुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हितफळें ॥२॥ तुका म्हणे आतां आम्हांसी हें भलें । अवघे चि जाले जीव जंत ॥३॥