भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीरामानें जगाचा उद्धार । करितां उच्चार दों अक्षरीं

shriramanen jagacha uddhar | karitan uchchar don aksharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीरामानें जगाचा उद्धार । करितां उच्चार दों अक्षरीं ॥१॥ पाहतां साधन आन नसे दुजें । रामनामें नासे महत्पाप ॥२॥ ब्रह्माहत्यारी वाल्हा नामेंचि तरला । रामायणीं मिरविला बडिवार ॥३॥ एका जनार्दनीं नामापरतें थोर । नसे बडिवार दुजियाचा ॥४॥