भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीराम श्रीराम वाचे म्हणतां । तेणें सायुज्यता हातां लागे

shriram shriram vache mhanatan | tenen sayujyata hatan lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीराम श्रीराम वाचे म्हणतां । तेणें सायुज्यता हातां लागे ॥१॥ श्रीराम श्रीराम ध्यान जयासी । तोची तपराशी पावन झाला ॥२॥ श्रीराम श्रीराम ज्याची वाणी । धन्य धन्य जनीं पावन तो ॥३॥ एका जनार्दनीं श्रीराम ध्यात । निरंतर चित्त रामनामीं ॥४॥